सरकारकडून अल्पसंख्याक समाजातील 5 कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

💁‍♂ सरकारकडून अल्पसंख्याक समाजातील 5 कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

📍 केंद्र सरकारच्या वतीने अल्पसंख्य समाजातील 5 कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुढील 5 वर्षे 3 प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जाणार

👍 या शिष्यवृत्त्यांमध्ये 50 टक्के विद्यार्थिनींना सामावून घेतले जाणार, अल्पसंख्य कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची दिली

🗣 अब्बास नक्वी काय म्हणाले?

▪ दहावीपर्यंत, दहावीनंतर आणि व्यावसायिक-तांत्रिक शिक्षणासाठीअशा 3 शिष्यवृत्त्यांचा लाभ अल्पसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळणार
▪ ज्या विद्यार्थिनींचे शिक्षण अपूर्ण राहिलेले आहे, त्यांना शिक्षणाची संधी मिळू शकेल. रोजगार मिळवण्यासाठी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाची गरज असते
▪ अल्पसंख्य समाजातील विद्यार्थिनींना नामांकित शिक्षण संस्थांमधून हे अभ्यासक्रम पूर्ण करता येणार
▪ आर्थिकदृष्ट्या मागास मुलींसाठी 10 लाख बेग हजरत महल बालिका शिष्यवृत्त्याही दिल्या जाणार

🧐 मोफत प्रशिक्षण : मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध, पारसी या अल्पसंख्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण-तरुणीसाठी केंद्र-राज्यातील प्रशासकीय सेवा, बँकिंग क्षेत्र, रेल्वे आदी क्षेत्रांत रोजगार मिळावा यासाठी मोफत प्रशिक्षणही दिले जाणार

🎯 मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण :

▪ अल्पसंख्य समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘पढो-बढो’ ही मोहीम राबवली जाणार
▪ आधुनिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मदरशांमध्ये शिक्षकांना हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, संगणक आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार
▪ मुख्यधारेतील शिक्षण संस्थांमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार असून हा कार्यक्रम पुढील महिन्यापासून सुरू होणार
▪ प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालये, आयटीआय, पॉलिटेक्निक महाविद्यालये, विद्यार्थिनींसाठी वसतीगृहे बांधली जाणार

आपल्याला असलेल्या सर्व शंका समाधान, तसेच करिअर विषयी सर्व माहिती एकाच स्थळी मिळण्याचे एकमेव ठिकाण.

अधिक माहितसाठी व आमच्याशी जोडले जाण्यासाठी आमच्या facebook page ला भेेट द्या.